सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांचे हस्ते पद्मशाली भवनाचे भव्य उद्घाटन

0
सामाजिक  कार्यकर्ते संजय पंदिलवार यांचे हस्ते पद्मशाली भवनाचे भव्य उद्घाटन  



आष्टी, 
 कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारला पद्मशाली समाजभवन उद्घाटनाचा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ पंदीलवार , माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई पंदिलवार गडचिरोली ,प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ. बेबीताई बुरांडे व ग्रा फ सदस्य दिवाकर सावकार कुंदोजवार आदी मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते भव्य पद्मशाली भवनाचे उद्घाटन करण्यात आले यानिमित्ताने उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी पद्मशाली समाजांना आपण दिलेल्या शब्दाला जागलं आहे आणि परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत असे सांगितले तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या समस्त बांधवांना शुभेच्छा दिल्या जमलेल्या सर्व बांधवांनी समाजातील बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला व हितगुज केली यावेळी पवित्र चंद्र प्रकाशाच्या दुग्ध शर्करा बरोबर स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पद्मशाली समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता समाजाचे अध्यक्ष वसंतराव येलेवार,उपाध्यक्ष रमेशराव पोन्नलवार, कोषाध्यक्ष श्री राजेश्वर बर्लावार,सचिव बाबुरावजी जोरगलवार, मारोतराव जोरगलवार, अशोकराव बिट्टुरवार, सुभाषराव येल्लेवार,प्रदिप कटकमवार व समस्त पद्मशाली बंधू भगिनी उपस्थित होते. समाजबांधवांनी कार्यक्रमास योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. सदर सभागृह हे संजयभाऊ पंदिलवार यांच्या अथक प्रयत्नाने साकारल्या गेले त्यानिमित्त त्यांचे पद्मशाली समाज बांधवा तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !