विज वितरण कंपनीचा उप कार्यकारी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात

0
विज वितरण कंपनीचा उप कार्यकारी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात


गडचिरोली:-
महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादीत, आलापल्ली ता. अहेरी जिल्हा गडचिरोली येथील उप-कार्यकारी अभियंता (वर्ग-२) विनोदकुमार नामदेवराव भोयर, वय ४७ वर्षे यांना २० हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारताना अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज दि. १७ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडले.

 सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैरअर्जदार भोयर, उप-कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.क. मर्या. आलापल्ली यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३ हजार ६९८ रुपयांचा दंड केला व सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून गैरअर्जदार भोयर यांनी ४० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांचे पर्यवेक्षणात पो. निरीक्षक शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैरअर्जदार  भोयर, उप-कार्यकारी अभियंता यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३ हजार ६९८ रुपयांचा दंड केला. सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून ४० हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने सदर रक्कमेतील पहीला टप्पा रुपये २० हजार लाच स्विकारंताता रंगेहाथ • मिळून आले. यावरुन गैरअर्जदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून त्यांचे मौजा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथील निवासस्थानांची ॲन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर टीमकडून झडती घेण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !