चंद्रपूर :
राज्यातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करीत सरकारला मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे, सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र सरकार व पाटलांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला असून चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
ओबीसी समाजाने आजपर्यंत सरकारला जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी केली मात्र अजूनही त्या मागणीची पूर्तता झाली अनही, अश्यातच मराठा समाजाने आरक्षण मागत जालन्यात आंदोलन सुरू केले.
मराठा समाजाच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज. केल्याने ते आंदोलन प्रकाश झोतात आले, आता मराठा समाजातील मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली, त्यावर सरकारने अध्यादेश काढण्याची तयारी पण सुरी केली आहे, मात्र सरकार व पाटील यांच्या भूमिकेवर ओबीसी समाजाने तीव्र निषेध नोंदवीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये
अशी मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्टपासून प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वस्तीगृह सुरू करणार अशी घोषणा केली होती मात्र ती घोषणा हवेत राहली, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गाती मूला-मुलींसाठी वस्तीगृह सुरू करावे, स्वाधार योजना सुरू करावी, जातनिहाय जनगणना करावी अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आले की सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास सरकारला आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊ, सरकारने आरक्षणाबाबत योग्य भूमिका घ्यावी.
चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला जिल्ह्यातील 25 संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे
उपोषण मंडपात यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर व सदस्यांची उपस्थिती होते.


बातमी चांगली कॉपी केली आहे फोटो सहित...
ReplyDelete