No title

0
आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्राफीक सिग्नल लावा; अन्यथा रस्ता रोको आंदोलन 


आष्टी शहर ग्रामीण पत्रकार संघटनेचा इशारा 

आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोठ्या प्रमाणावर सुरजागड कचा मटेरियल लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे लांबच्या लांब रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे त्यासोबतच बसेस,बाकी वाहणे कामानिमित्त जानारे दुचाकी त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आष्टी परिसरातील आष्टी शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ह्या वाहनांच्या वर्दळीने नेहमीच गजबजलेला असतो. वाहतूककोंडी वाढण्यामागील चौकाच्या कडेला असलेल्या फळविक्रेते ,चहाच्या टपऱ्या, हातगाड्या व स्वीट मार्टसारख्या दुकानांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना वाहने थेट रस्त्यावरच पार्क करून जावे लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी व गोंधळ निर्माण होतो. या मोठ्या समस्यांमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः शाळा कॉलेज व कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचा तासभर वेळ वाहतूक कोंडीत जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वाहतूक कोंडीमुळे शालेय बसप्रवासी वाहने तसेच इतर वाहनांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. पादचारी नागरिकांनाही रस्ता ओलांडणे अवघड होत आहे. वाहतूक पोलिस व सुरजागड लाॅयन्डस मेटल कंपनी कडून ठेवण्यात आलेले सेक्युरटी गार्ड तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करतात. 
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार कोनसरी येथील गडचिरोली कडे जाणाऱ्या रोडवर लाॅयन्डस मेटल कंपनीने सिग्नल लावले त्याप्रमाणे आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी लाॅयन्डस मेटल कंपनी कडून सिग्नल लावण्यात यावे अशी मागणी आष्टी शहर ग्रामीण पत्रकार संघटने कडून केली जात आहे. लाॅयन्डस मेटल कंपनी कडून कोनसरी येथील गडचिरोली कडे जाणाऱ्या रोडवर ज्याप्रमाणे ट्राफीक सिग्नल लावण्यात आले त्या धर्तीवर आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्राफीक सिग्नल लावण्यात यावे ही जबाबदारी कोणत्याही विभागाची असेल त्या विभागानी तात्काळ याची दखल घेत आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्राफीक सिग्नल लावावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आष्टी ग्रामीण पत्रकार संघटनेकडून देण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !