वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
 वाघाच्या हल्ल्यात महिला  ठार 



देसाईगंज तालुक्यातील फरी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या ची घटना आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोज सोमवार ला 09 वाजताच्या सुमारास उघडकीस आली .प्राप्त झालेल्या माहिती नुसार वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव महानंदा दिनेश मोहूर्ले वय 40  वर्षे आहे.शिवराज पूर  फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगला लगत असणाऱ्या स्वतः च्या  शेतावर जनावरां करीता गवत गवत घेत असताना अचानक  तिच्यावर वाघा ने हल्ला केला, व सदर महिलेला वाघा ने जंगलात फरफट त  नेले ही बाब फरी येथील काही लोकांच्या लक्षात येताच लोकांनी जंगलाकडे धावा केला परंतु तो पर्यंत महिला ठार झाली होती . सध्या शेतातील पाणी करण्या साठी किंवा निंदन करण्या साठी अनेक शेतकरी बांधव शेतावर सकाळच्या सुमारास जात असतात,वास्तविक पाहता मागील काही दिवसांपासून देसाईगंज तालुक्यात वाघा ची दहशत कमी झाली असल्यामुळे अनेक शेतकरी बांधव शेतावर बिन धास्त जात होते परंतु आजच्या वाघा च्या हल्ल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यां मध्ये वाघा ची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने वाघा चा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची माहिती होताच पन्नास हजार रुपयाची सानुग्रह मदत केली आहे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !