आष्टी च्या वैनगंगा नदी पुलावरील खड्ड्यांचे होणार तरी काय ?
शासन अपघात होण्याची वाट तर पहात नाही ना ?
आष्टी:-
आष्टी ते चंद्रपूर जाणाऱ्या वैनगंगा नदी पुलावरील खड्ड्यांचे होणार तरी काय असा प्रश्न आवागमन करणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
सदर पुलावरून मोठमोठे अवजड वाहण आवागमन करीत असल्याने सदर पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून एक महिन्यापूर्वी आ.डॉ.देवराव होळी यांनी पाहनी केली होती व आठ दिवसांत पुलाची दुरुस्ती करण्यात येईल असे म्हटले होते मात्र एक महिण्याचा कालावधी लोटला तरी दुरुस्ती करण्यात आली नाही आता काय शासन अपघात होण्याची वाट पाहत आहे काय असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
अवजड वाहतूक बंद ठेऊन पुलावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.


