पुन्हा भंगार बसचा फटका बसला प्रवाशांना

0
पुन्हा भंगार बसचा फटका बसला प्रवाशांना 


आष्टी:-
 पुन्हा एकदा भंगार बसचा फटका प्रवाशांना बसला असल्याची घटना आज दि ११ सप्टेंबर ला सायंकाळी ८ वाजता चे दरम्यान घडली 
अहेरी वरुन भंडारा कडे जात असलेली एस टी क्रं एम एच ४० व्हाय ५८६८ ही येणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बिघडली याचा फटका प्रवाशांना बसला सदर बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे .
 रात्रोची वेळ असल्याने आणि या मार्गावर पुन्हा बस नसल्याने ते ४० ही प्रवासी मिळेल त्या खासगी वाहनाने गडचिरोली कडे रवाना झाले.
यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच वेळा भंगार बसचा अनुभव पाहता शासनास अजूनही जाग आली नाही असेच दिसते आहे. तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्री यांनाही या बाबतीत काही देणेघेणे नाही सामान्य जनतेला होत असलेला त्रासाला कंटाळून एस टी कडे पाठ फिरवली तर नवल नकोच

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !