महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथे स्वातंत्र्य दिन साजरा
आष्टी:-
स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथे दिनांक 15 ऑगस्ट 2023 ला 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे ध्वजारोहण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम उर्फ बबलू भैया यांच्या हस्ते करण्यात आले मा. सौ शाहीन भाभी हकीम अध्यक्ष नागपूर विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. शैलेंद्र खराती पर्यवेक्षक मा. बैस हे उपस्थित होते कार्यक्रमात दरम्यान प्राचार्यांनी शुभेच्छाचा संदेश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात आला. नंतर प्रभात फेरी काढून सर्व महाविद्यालय विद्यार्थी व कर्मचारी वृद्ध ग्रामपंचायत आष्टी च्या ध्वजारोहण कार्यक्रमास सहभागी झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील प्रतिष्ठित गणमान्य नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहण व प्रमुख अतिथी यांनी. उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट निमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

