वाघाची कातडी तस्करी प्रकरणी दोन आरोपी जेरबंद

0
वाघाची कातडी तस्करी प्रकरणी दोन आरोपी जेरबंद 


अशोक खंडारे मुख्य संपादक 

भंडारा :-
 दि. 21 जून : वाघाच्या कातडी सह २ आरोपींना वन विभागाने आज
ताब्यात घेतले आहे. वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती नागपूर वन विभागास मिळाली. त्या माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करून भंडारा विभागाच्या पथकासह संयुक्त कार्यवाही करून वाघाच्या कातडी सह २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आज दि. २१ जून रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पवनी येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार आहे. अशी माहिती वन विभागाला मागील काही महिन्यापूर्वी मिळाली होती. त्यावर वन विभाग नजर ठेवून होते. आज सकाळी पवनी वनपरिक्षेत्रात सापळा रचून तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपी निलेश सुधाकर गुजराथी रा. चंद्रपूर वय ३३ तर विकास बाधोली बाथो रा. चंद्रपूर वय ३१ वर्ष यांना वाघाची कातडी आणि दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलामाद्वारे वन गुन्हा नोदविण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर रमेश कुमार, उपवसंरक्षक नागपूर भारत सिंह हांडा, उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई यांचे मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी. जी. कोडापे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) पवनी हिरालाल बारसगडे, वन परिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी प्रमोद वाडे (प्रा), निलेश तवले, दिनेश पडवळ, आर एस पोरते, थुले, वासनिक सर्व वनरक्षक आणि भंडारा वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी सापडा यशस्वी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. पुढील तपास वाय. व्ही. नगुलवर करीत आहेत. या गुन्ह्यात आणखी आरोपी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !