प्रियकराला जंगलात भेटायला जाने झाले घातक ,चार जणांनी केला बलात्कार
पुणे :-
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहेत. याच दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर प्रियकराच्या मित्रांनीच सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव
पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी (23 जून) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी तिच्या प्रियकराच्या चार मित्रांनी दोघांचाही पाठलाग केला व त्यांना गठत आरोपींनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चार आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. संदेश जाधव, संजय, आदेश जाधव, आणि चंद्रकांत भालेराव अशी अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

