सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला एसीबी च्या जाळ्यात

0
 सहाय्यक पोलिस निरीक्षक अडकला एसीबी च्या जाळ्यात



अशोक खंडारे मुख्य संपादक

अहमदनगर,
 दि. 16 मे 2023 दाखल गुन्हयात अटक न करता अटकपूर्व
जामिन मंजूर होण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात 30 हजार रुपयाची लाच मागितली तडजोडीअंती 25 हजार रुपये घेण्याचे मान्य केले 15 मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. अहमदनगर पोलिस दलातील कोतवाली पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक अशोक पवार (35) असे लाच मागणाऱ्या पोलिस आरोपीचे नाव आहे. यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्या बरोबर असलेल्या चौघांविरुध्द
कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयात त्यांना अटक न करता अटकपूर्व जामिन मंजूर होण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक अशोक पवार यांनी प्रथम 30 हजार रुपयाची लाच मागितली तडजोडीअंती 25 हजार रूपये घेण्याचे मान्य केले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एपीआय विवेक पवार यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या पडताळणी दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक अशोक पवार यांनी 25 हजार रुपयाची लाच घेण्याचे मान्य केले, त्यामुळे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन आणि पोलिस अंमलदार नितीन नेटारे यानी ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !