इंदिरा गांधी विघालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

0
इंदिरा गांधी विघालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


प्रमोद झरकर तालुका प्रतिनिधी चामोर्शी

चामोर्शी:-
गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ येनापुर द्वारा संचालित , इंदिरा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येनापुर चा फेब्रुवारी २०२३ एच.एस.सी.(वर्ग १२वा) बोर्डाचा निकाल ८०% टक्के असून तीन विद्यार्थी कु. भाविका मिसार ७९ %,
स्वप्निल लोणारे ७८.६७%, तर कु.मोनिका चक्कावर ७६.१७ % गुण घेऊन विशेष प्राविण्यप्राप्त गुणांसह, कनिष्ठ महाविद्यालय व परीक्षा केंद्रामधून अव्वल ठरले आहेत.२८ विद्यार्थी ६२% पेक्षा जास्त गुण घेऊन प्रथम श्रेणी तर २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कनिष्ठ महाविद्यालय येनापुरने गुणात्मक व संख्यात्मक अव्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ येणापूरचे अध्यक्ष नागोबाजी पाटील पेदापल्लीवार,सचिव जयंतराव येलमुले,  उपाध्यक्ष  मोरेश्वरराव येडलावार, कोषाध्यक्ष, दामोधर चतुर व संस्थेच्या सर्व माननीय पदाधिकारी, प्राचार्य  अशोकराव वाकुडकर, पर्यवेक्षक वासुदेव गोगले व सर्व क.महा.प्राध्यापक वृंद , शिक्षक व शिक्षकेतर वृंद सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आशीर्वाद व हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !