गडचिरोली शहरात रक्तदान विषयी जनजागृती

0
 गडचिरोली शहरात रक्तदान विषयी जनजागृती 


प्रमोद झरकर तालुका प्रतिनिधी चामोर्शी

चामोर्शी:-
जनहित ग्रामीण विकास बहूउद्देशिय संस्था येनापुर द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोधमोहिम व जनजागृति अभियानाच्या माध्यमातून आज दिनांक 25 मे 2023 रोज गुरुवार ला गडचिरोली शहरातील बसस्टॉप परीसर, महिला व बाल रूग्णालय, इंदिरा नगर, शिवाजी वाचनालय परिसरात युवक, युवती, महिला, पुरुष यांची भेट घेवून रक्तदान विषयी माहिती देण्यात आली. रक्तदान करीता सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि रक्तदान केले पाहिजे कारण रक्ताची गरज केव्हा कुन्हाला पडेल हे काही सांगता येत नाही त्याकरीता प्रत्येकानी मानवतेच्या नात्याने जेव्हा एखादया व्यक्तीला रक्ताची तात्काळ गरज भासली तर अशा वेळी आपण जाऊन रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजे. 
           सदर कार्य जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून रक्तदानाचे महत्व पटवून देताना फुले आंबेडकर समाजकर्य महाविद्यालयचे विद्यार्थी महेश हर्ष यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !