राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सुपुत्रा सह अनेकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

0
राष्ट्रवादी  काँग्रेस चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सुपुत्रा सह अनेकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश


अशोक खंडारे मुख्य संपादक 

गोंदिया:-
 दि. 26 मे 2023 : अर्जुनी मोरगाव विधान सभा ६३ क्षेत्राचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी सडक अर्जुनी आणि अर्जुनी( मोर) येथील नगर अध्यक्ष आणि सदस्यांसह शिवसेना शिंदे गटात 20 ते 25 लोकांनी आज पक्ष प्रवेश केल्याचे खळबळ जनक वृत्त समोर आले आहे.

सडक अर्जुनी नगर पंचायत मध्ये शिव सेना, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत. अश्यात भाजप सोडून सर्व पक्षाचे पदाधिकारी शिव सेना पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.


शिव सेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. यात सडक अर्जुनी नगर पंचायत चे नगर अध्यक्ष तेजराम मळावी, उपाध्यक्ष वंदना डोंरगरवार, बांधकाम सभापती अंकित भेंडारकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र वंजारी, पाणी पुरवठा सभापती साईस्ता मतीन शेख, दीक्षा राजकुमार भगत महिला बाल कल्याण सभापती, माजी नगर अध्यक्ष देवचंद तरोने, माजी नगर अध्यक्ष ससिकला टेंभुर्णे, नगर सेवक गोपीचंद खेडकर, नगर सेवक अशलेस अंबादे, नगर सेवक तायमा जुबेर शेख, नगर सेवक कामिनी कोवे, दिलीप गभने माजी नगसेवक, धनवंत कोवे, विदेश टेंभुर्ने, मतीन शेख अश्या एकूण 16 लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे.

तर अर्जुनी मोरगाव नगर पंचायत चे नगर अध्यक्षा आणि बांधकाम सभापती व नगर सेवक अश्या एकूण 5 लोकांनी देखील आज पक्ष प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत 21 लोकांनी राष्ट्रवादि पक्षाला राम ठोकला आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !