अल्पवयीन मुलीचे अपहरण

0
 अल्पवयीन मुलीचे अपहरण


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

गडचिरोली:-
 चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलिस मदत केंद्र हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 8 मे रोजी घडली. याप्रकरणी 9 मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रेगडी हद्दीतील 17 वर्षीय मुलीला 8 मे रोजी घोट जवळील श्यामनगर येथील 20 वर्षीय तरुणाने आपल्या मोटारसायकलवर बळजबरीने बसवून पळवून नेले आशी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रेगडी पोलिस मदत केंद्रात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवकाचा शोध सुरु असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत यांनी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !