अशोक खंडारे मुख्य संपादक
जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणुक प्रक्रिया दिनांक 12 मे शुक्रवारी पार पडली. गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शशिकांत साळवे तर उपसभापती बळवंत लाकडे यांची निवड करण्यात आली. गडचिरोली बाजार समितीच्या निवडणूकीत 18 पैकी 18 जागी भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले होते. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार तर उपाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे कनिष्ठ बंधू रवींद्र बाबा आत्राम यांची निवड झाली. यात 18 पैकी 11 जागावर अजय कंकडालवार -रवींद्रबाबा आत्राम यांच्या गटाने बाजी मारली तर 6 जागावर भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत गटाला समाधान मानावे लागले होते.. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अतुल गण्यारपवार तर उपसभापतीपदी प्रेमानंद मल्लिक यांची निवड करण्यात आली. चामोर्शीत अतुल गण्यारपवार यांच्या गटाचे 12 उमेदवार विजयी झाले तर सर्वपक्षिय पॅनलला 6 जागावर समाधान मानावे लागले. सिरोंचा बाजार समितीच्या सभापती पदी भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत गटाचे सतीश गंजीवार तर उपसभापती कृष्णमुर्ती रिकुला यांची निवड झाली तर आरमोरीत भाजप पुरस्कृत पोरेडीवार गटाचे ईश्वर पासेवार तर उपसभापती वेंकटी नागीलवार यांची निवड झाली. आरमोरीत पोरेडीवार गटाने 18 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या.