सेवेत पून्हा सामाऊन घेण्याकरीता हातपंप दूरूस्ती कामगाराचे आमरण उपोषण

0
सेवेत पून्हा सामाऊन घेण्याकरीता हातपंप दूरूस्ती कामगाराचे आमरण उपोषण



अशोक खंडारे मुख्य संपादक


कूरखेडा-
     सलग १५ वर्ष सेवा बजावूनही काही दिवस प्रकृतीचा कारणाने कर्तव्यावर गैरहजर राहील्याने सेवेतून कमी करण्यात आले हा अन्याय विरोधात मागील पाच सहा वर्षापासून न्याय करीता वनवन भटकूनही न्याय मीळत नसल्याने पिडीत हातपंप दूरूस्ती कामगाराने येथील पंचायत समिति कार्यालया समोर आमरण उपोषण आंदोलन सूरू केले आहे
      पिडीत कामगार देवचंद लक्ष्मन ढवळे रा.घाटी ता कूरखेडा हा पंचायत समिति कूरखेडा अंतर्गत कार्यरत हातपंप दूरूस्ती वाहनावर कामगार म्हणून मानधन तत्वावर  सन २००२ मध्ये रूजू झाला होता सलग १५ वर्षे कूरखेडा पंचायत समिति सह जिल्हयातील काही अन्य पंचायत समिति अंतर्गतही याने सेवा बजावलेली आहे मात्र सन २०१७ मध्ये प्रकृतीचा कारणाने कर्तव्यावर काही दिवस गैरहजर राहील्याने तोंडी सूचणा देत त्याची सेवा समाप्त करण्यात आली असा त्याने आरोप केला आहे मागील चार वर्षापासून सेवेत रूजू करून घ्यावे याकरीता जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती अर्ज करीत आहे यापूर्वी जिल्हा परिषदेत आंदोलन सूद्धा केले आहे मात्र न्याय मीळत नसल्याने त्याने कालपासून येथील पंचायत समिति कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सूरू केले आहे मात्र प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !