नाट्यश्री तर्फे पुस्तक प्रकाशन व कविसंमेलन सोहळ्याचे आयोजन

0
 नाट्यश्री तर्फे पुस्तक प्रकाशन व कविसंमेलन सोहळ्याचे आयोजन 


अशोक खंडारे मुख्य संपादक

गडचिरोली:-
 स्थानिक 'नाट्यश्री' च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार "चुडाराम बल्हारपुरे" लिखित व मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबुराव शेडमाके" या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या २८ तारखेस झाडीपट्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे हस्ते प्रा. विलास निंबोरकर यांचे घरी, परिश्रम निवास, आरमोरी रोड, गडचिरोली येथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य समिक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, राहणार असून प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत. तर प्रा. डॉ. राजकुमार मुसने हे नाट्य समीक्षण करणार आहेत.
           विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रा. डॉ. एस.एन.पठाण, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. सदानंद बोरकर (नाटककार) , प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. शेखर डोंगरे (नाट्य कलावंत), प्रा. श्रीकांत कुतरमारे, अनिरुध्द वनकर (नाटककार व दिग्दर्शक), प्रा. डॉ. नरेश मडावी, प्रा. डॉ. माधव कांडणगीरे, प्रा. योगीराज नगराळे, प्रा. डॉ. सविता सादमवार व प्रसिद्ध आदिवासी साहित्यिका कुसूमताई आलाम उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी झाडीपट्टीतील संगीतकार विठ्ठल खानोरकर हे क्रांतीवीर बाबुराव शेडमाके या नाटकातील नाट्यगिते सादर करणार आहेत.
           या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कविंचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कवी सहभागी झालेले आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी, साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री चे दादा सुंदरकर, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा. अरुण बुरे व सौ. कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !