वाघाच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या घरी माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांनी दिली भेट व शासनाच्या वतीने पाच लाख रुपयाचा धनादेश केला सुपूर्द

0
 वाघाच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या घरी माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांनी दिली भेट व शासनाच्या वतीने पाच लाख रुपयाचा धनादेश केला सुपूर्द 


अशोक खंडारे मुख्य संपादक 

सावली:-
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ नामदेव उसेंडी यांनी पोलिस अधिकारी व वनविभागाच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत वाघाने हल्ला केलेल्या घटना स्थळी पाहणी केली व वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वाघोली येथील घरी सांत्वनपर भेट घेऊन त्याना आधार दिला
 सावली तालुक्यातील वाघोली येथे वाघाच्या हल्यात निर्दोष महिलेचा जीव गेला. वाघाच्या दहशतीमुळे घराबाहेर, शेतशिवरात व इतरत्र कुठेही निघणे कठीण झाले आहे. त्या भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना, राज्याचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ वन विभागातील अधिकारी यांची वाघोली येथे बैठक घेऊन वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावे. गावशीवरात कोणत्याही वन्यप्राण्यांची घुसखोरी व त्यामुळे होणारी जिवहानी टाळण्यासाठी लवकरात लवकर वनविभागातर्फे उपाय योजना करण्याचे सूचना केल्या आहेत. याचदरम्यान वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या कुटुंबाना त्यांनी सांत्वना देत आधार दिला. या वेळी वनविभागातर्फे मिळणारे २० लक्ष रुपयापैकी ५ लाख रुपयांचा धनादेश मृतकांच्या कुटुंबियांना त्यांनी सुपूर्द केला. 
   यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिनेश पाटील चिटणुरवार, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, तुळशीदास पाटील भोयर, वन अधिकारी, पोलीस अधिकारी व गावातील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !