खेडेगावात पाण्याची भीषण टंचाई

0
 खेडेगावात पाण्याची भीषण टंचाई


सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक वैनगंगा वार्ता

धानोरा तालुक्यातील  मुरुमगाव अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरील  गट ग्रामपंचायत चे गाव खेडेगाव येथे पाण्याची भीषण टंचाई भासली आहे भर उन्हात दोन वाजता विहिरीचे पाणी काढत असताना महिला दिसून आल्या तेव्हा त्यांना विचारले असता सर्वत्र पाण्यासाठी शुकशुकाट असून विहिरीला सुद्धा पाणी नसल्यामुळे जे मिळेल ते पाणी काढण्यासाठी भर उन्हात आम्हाला पाणी भरावे लागते ग्रामपंचायत स्तरावरून कुनीही ही जबाबदारी सरपंच, सचिव व सदस्य घेत नसल्याने ही भीषण परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी खेडेगाव वासियांनी केली आहे सध्या तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू आहे एरवी ग्रामस्थांना ग्रामपंचायत स्तरावरून कोणतेही काम नसल्यामुळे ग्रामपंचायत ही केवळ शोभेची वास्तू ठरलेली आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कामाचा अभाव असल्याने सदस्य सुद्धा काहीच करू शकत नसल्याची खंत खेडेगावासीय महिला पुरुषाने व्यक्त केलेली आहे सध्या पाण्याची भीषण टंचाई दूर करावी अशी मागणी खेडेगाव वासीयांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !