आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचे आज दि २६ ऑगष्ट ला दुपारी दोन उघडकीस आली.
मृतक तरुनाचे नाव रोहीत विनायक बावणे वय २५ रा.आष्टी असे असून त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली
मयताची नातलग कांचन मांडवगडे हि अनिल कापड दुकान येथे काम करीत आहे तिची १२.३० ला जेवनाची सुट्टी झाली तेव्हा ती घरी पोहचून आपले जेवन आटपून आराम केला त्यानंतर ती रोहीत च्या घराकडे गेली तेव्हा तिला रोहीत फाशी लागलेल्या स्थीतीत दिसून आला लागलीच तिने आपल्या कुटुंबातील लोकांना माहिती दिली त्यावरुन त्यांचे भाऊ अर्पित बावणे यांनी त्याला खाली उतरून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.आष्टी पोलीस स्टेशन ला
एम एल सी पोहचताच ग्रामीण रुग्णालयात पोलीस दाखल झाले व मृतकस शवविच्छेदन करण्यासाठी शवागारात नेले शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधीक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कु.कांबळे त्यांचे सहकारी करीत आहेत.

