वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर यांचेवरील आरोप तथ्यहिन संबंधिताद्वारे मानसीक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न

0
वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर यांचेवरील आरोप तथ्यहिन संबंधिताद्वारे मानसीक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न -


क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी 

अहेरी:-
 आलापल्ली वनविभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांचेकडे पेटमिली वनक्षेत्राचा अतिरीक्त कारभार असतांना त्यांनी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी काहींवर कारवाई केली होती. सदर प्रकरण अहेरी न्यायालयात
प्रविष्ट आहे. यातील आरोपी हे भाजपा
जिल्हा उपाध्यक्ष प्रणव खुने यांचे आप्तेष्ट असल्याने शेरेकर यांचेवर दबाव आणून मानसिक खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने खुणे यांनी त्यांचेवर गंभीर आरोप करीत
मुख्य वनसंरक्षक यांचेकडे तक्रार केली.मात्र सदर आरोप तथ्यहीन असून आप्तेष्ठांसह स्वतःच्या बचावासाठी गैरव्यवहाराचे आरोप करणा-या खुणे यांचेवर फोजदारी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकतें
संतोष ताटीकोंडावार यांनी भामरागड
उपवनसंरक्षक यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, भाजपाचे प्रणव खुणे यांनी आलापल्ली वनपरिक्षेत्र
अधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या वन परिक्षेत्रात गुरू प्रतिबंधक चर खोदणे व
इतर कामात झालेल्या गैरव्यवहारासह व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी
करण्यासंबंधाने मुख्य वनसंरक्षक यांचेकडे तक्रार केली होती. मात्र सदर आरोप सफशेल चुकीचे आहेत. योगेश शेरेकर वनविभागात धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे पेरमिली वनपरिक्षेत्राचा प्रभार असतांना सकनिगटा
वनपरिक्षेत्रातील अवेध मुरुम उत्खनन
प्रकरणी नितीन खुणे, रोहण खुणे, मयुर खुणे, लोकेश डोंगरवार यांचेवर कारवाई करीत वनकायद्यान्वये गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरण सद्यस्थितीत अहेरी न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.


 सदरप्रकरण 20 जून रोजी खटला साक्ष
पुराव्याकरिता मुकर्रर आहे. सदर प्रकरणात शेरेकर तपास अधिकारी असून त्यांचेवर खटला कमकूवत करण्यासंदर्भात दबाव आणण्यासाठी
व त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हेतुपरस्पर तक्रार
देऊन आप्तसंबंधींना गुन्ह्यातून
वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे
निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील अनेक वनपरिक्षेत्रात खुणे व त्यांचे आप्तेष्ट यांचेवर वनगुन्हे दाखल आहेत. सदर प्रकरणी कार्यवाही करीत असल्यापासून प्रणव खुणे
स्वतःच्या बचावासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शेरेकर यांनी आलापल्ली वनविभागाचा
कारभार स्विकारल्यापासून नियमांची
पायमल्ली करणा-यांना कठोर शासन
करीत आहेत. मात्र दलित समाजातील
शेरेकर यांचेवर आटोप-प्रत्यारोप करून त्यांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न खुणे करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


एकीकडे भाजप पक्ष गाव ते देशपातळी दलित, मागासवर्गीयांसाठी नेतृत्वाची संधी देत आली आहे. त्यामुळे भाजपाविषयी
आपलेपणाची भाव आहे. मात्र त्यांच्याच पक्षातील जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या खुणेद्वारे दलित समाजातील प्रामाणिक अधिका-यावर आरोप करून
त्याचे खच्चीकरण केले जात आहे. खुणेच्या या कृतीमुळे दलित, मागासवर्गीय समाजामध्ये भाजपा पक्षाविषयीचा विश्वास
संपुष्टात येण्याचे चित्र निर्माण होत आहे.
त्यामुळे शासन व वनविभाग प्रशासनाने वनगुन्हे दाखल असलेल्या खुणे यांच्या तक्रारीकडे फारसे गांभीयनि न घेता उलट
त्याचेवर फोजदारी गुन्हा दाखल करावा,
अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !