प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
आरमोरी:-
तालुक्यातील सोनेरांगी जंगलात कक्ष क्र ३०९ मध्ये तेंदुपत्ता संकलन करीत असताना निलगाईच्या धडकेत एक महिला जखमी झाली. जखमी झालेल्या महिलचे नाव रत्नमाला गेडाम रा. मोहझरी (शिवणी) असे असून ती व तिचे पती गोपाल गेडाम हे तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी सोनेरांगी परिसरातील जंगलात गेले होते तेंदुपत्ता संकलन करीत असताना निलगाईचा कळप धावत येत होता असे असून आल्यावर वेगवेगळ्या दिशेने अलग झाले मात्र एका निलगाईने रत्नमाला गेडाम हिला जोरदार धडक दिली तेव्हा ती खाली कोसळली व बेहोश झाली तेव्हा पतीने जाऊन तिला पाणी पाजून रोग पर्यंत कसेबसे आनले तेवढ्यात एक दुचाकीस्वार देलनवाडी कडे जात होता त्याला दवाखान्यात नेऊन देन्याची विनंती केली लगेचच ते देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार सुरू केले व डोळ्याच्या खाली आणि वर टाके लाउन दिले.औपधोपचार झाल्यावर तीला घरी आणण्यात आले आहे मात्र जखम अधीक तीव्र असल्यास सदर कुटुंब फार गरीब असल्याने पुढील उपचारासाठी वन विभागाने सानुग्रह मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.वनविभागाचे कर्मचारी व इतर घटना स्थळी पोहचून पंचनामा केला आहे.

