अशोक खंडारे मुख्य संपादक
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील अनेक गावांत अवैध दारू विक्री करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत मात्र या बाबींवर कोनीही लक्ष देत नाहीत कुनाच्या आशिर्वादाने ही अवैध दारू विक्री सुरू आहे हा प्रश्न उपस्थित होतो आहे.हीच बाब कोनसरीच्या ग्रामस्थांना खटकली त्यामुळे
कोनसरी गावातील वाढता दारूचा ओघ पाहून, दारुमुळे उध्वस्त होणारे कुटुंब पाहून कोनसरी ग्रामपंचायतीने दारू बंदी करीता एक समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून रात्रीला संपूर्ण तयारीने रात्री 2 वाजता पासून पहारा दिला गेला. पहाटेला 4:30 वाजता दरम्यान कमिटीच्या हाती यश लागले,एका दुचाकीस्वाराकडून दारू पकडण्यात आली . सदर व्यक्ती गावात दारू सप्लाय चे काम अनेक दिवसापासून करीत असून त्याचे नाव नारायण बच्छाड असे आहे. ही व्यक्ती रामकृष्णपूर येथील रहिवासी आहे. त्याला दारू भरलेल्या गाडी सहीत पकडण्यात आले, गाडीवर कॅरेट मध्ये 35 लिटर मोहाची दारू सापडली. त्याला पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. व त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर व्यक्तीवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखविली जाणार नाही या साठी आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
दारू विक्री करून गावातील तरुण युवकांचे बळी घेणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना हा शेवटचा इशारा देण्यात आला आहे
आता सापडल्यास ही कमिटी कसलाही विचार न करता गुन्हा दाखल करून आपल्यावर दंड सुद्धा लावले जाईल आणि ग्रामपंचायत कडून उचित कार्यवाही केली जाईल अशी तंबीही देण्यात आली आहे
यात कोनसरी गावचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, पोलीस पाटील यशवंत मानापुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के, दारू मुक्ती समिती सदस्य रवींद्र कावडे, जयवंत कोवे व इतर सदस्यांनी मोलाचे कार्य केल आहे.
परिसरातील सर्व सरपंचांनी गावात मताचे राजकारण करण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी कार्य करावे.अवैध दारु विक्री बंद करावी गावात कोनतेही अवैधधंदे सुरू ठेऊ नये विकासाच्या आड येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवावा, तरच सरपंच पदाला न्याय मिळेल. आणि लोकांचा सरपंचांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. श्रीकांत पावडे
सरपंच ग्रामपंचायत कोनसरी

