उज्वल यशाची परंपरा कायम, ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचा निकाल 97.82%

0
उज्वल यशाची परंपरा कायम, ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचा निकाल 97.82%



प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

आष्टी:-
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर अंतर्गत घेण्यात आलेल्या बाराविच्या परीक्षेत आष्टी येथिल महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 97.82 टक्के लागलेला आहे. त्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे


 कला शाखेतून प्राची विकास म्हशाखेत्री हिने 81.17 टक्के गुण घेऊन कॉलेज मधून व केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला तर रोशनी रविन्द्र गुरनुले हिने 70.83 टक्के गुण घेऊन व्दितिय तर जय योगपती वाकूडकर ह्याने 66. 33 टक्के गुण घेऊन तृतिय येण्याचा मान मिळविला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव अब्दुल हकिम अब्दुल रहिम, उपाध्यक्ष अब्दुल जमिर अब्दुल हकिम, सौ. शाहीन हकिम मॅडम, प्राचार्य शैलेन्द्र खराती, पर्यवेक्षक किशोरसिंह बैस तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी कु .प्राची विकास मशाखेत्रीच्या घरी जाऊन कनिष्ठ महाविघालयातील सर्व शिक्षकांनी तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले तथा तिला तिच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !