प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
आष्टी:-
आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत मलेझरी येथील शेतात गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केल्याचे दि २७ मे ला सायंकाळच्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव लक्ष्मण चांदेकर वय ५७ वर्षे रा.मलेझरी असे आहे
सदर इसम ह्याने घटनेच्या दिवशी सकाळी आपल्याकडील असलेली लहान बैलजोडी विकली व खरेदीदारास ते बैल गावाबाहेर सोडून देण्यास गेला त्यानंतर घरी येऊन शेजारच्या गावात मोठ्या बैलास जोड घेतो म्हणून घरातील कुटुंबातील लोकांना सांगितले तेव्हा भरपूर उन्हाचा तडाखा असल्याने त्यांना मज्जाव करण्यात आला. दुपारच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय आराम करीत असता लक्ष्मण घरुन निघून गेला व स्वतः च्या शेतात जाऊन शेतातील झाळाला गळफास लावून घेतला . सायंकाळच्या सुमारास कुटूंबियांना ही बातमी मिळताच पोलिस स्टेशन आष्टी येथे माहिती दिली त्यावरुन पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला शवविच्छेदन झाल्या नंतर शव नातलगांच्या सुपूर्द करण्यात आला अधीक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत

