लॉयड्स मेटल्स ॲड एनर्जी कंपनी तर्फे एक जूनला मोफत हेल्मेट वाटप

0
लॉयड्स मेटल्स ॲड एनर्जी कंपनी तर्फे एक जूनला मोफत हेल्मेट वाटप


सिनेअभिनेत्री नक्षत्रा उपस्थित असणार


अशोक खंडारे मुख्य संपादक

अहेरी:- 
सुरक्षा सप्ताह निमित्य 1 जून गुरुवार रोजी लॉयड्स मेटल्स ॲड एनर्जी कंपनी लिमिटेड तर्फे मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आलापल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
    भव्य हेल्मेट वाटप कार्यक्रमात उदघाटक आमदार धर्मराव बाबा आत्राम , अध्यक्षस्थानी गुजरात येथील सेवानिवृत्त डीजीपी एस. खांडवावाला राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून सिनेअभिनेत्री नक्षत्रा मेढेकर तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांची असणार आहे.
     1 जून गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता वीर बाबूराव शेडमाके चौक, आलापल्ली येथे मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम असून दुचाकी वाहन चालकांनी चालक परवाना व आधार कार्डचे झेरोक्स प्रत 31 मे पर्यंत आलापल्ली ग्राम पंचायतीत जमा करून आपल्या नावाची नोंदणी करून मोफत हेल्मेट वाटपाचे लाभ घेण्याचे आणि भव्य मोफत हेल्मेट वाटपाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोकांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !