मोहफुल गोळा करणे बेतले जीवावर वाघाने घेतला नरडीचा घोट

0
 मोहफुल गोळा करणे बेतले जीवावर
वाघाने घेतला नरडीचा घोट 


परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण 

प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

नागभीड : मोहफूल वेचण्यासाठी गावाजवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना नागभीड येथून जवळच असलेल्या तुकूम गट नंबर ६०५ मध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 
 लगेचच वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले.
 १२ मार्च २०२३ रोजी नागभीडजवळील शिवटेकडीजवळ वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. लवकरच तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होईल. या घटनांना आळा घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !