ट्रकचा ब्रेक न लागल्याने दुचाकीची धडक दोन ठार एक जखमी

0
ट्रकचा ब्रेक न लागल्याने दुचाकीची धडक दोन ठार एक जखमी 


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

  ०५ एप्रिल :- कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटावर छत्तीसगड वरुन कुरखेड्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने उतारावर सुसाट वेगाने जात असताना समोर असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. याच ट्रकने समोरून येणा-या ट्रकला धडक दिल्याने दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाल्याची घटना ०५ एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास पुराडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.


सविस्तर वृत्त असे की, कोरची तालुक्यातील नांदळी येथील सुनहेर बिरजू कुमरे यांच्याकडे बहीण जावयाची तेरवी निश्चीत करण्यासाठी मालेवाड्यावरून नागसु दुर्ग कुंजाम (वय 65), रमेश नागसु कुंजाम (वय 39) व रामदास दर्याव कुंजाम (वय 50) हे मोटारसायकल क्र. एमएच 33 डी 9196 ने सकाळी नांदळी येथे जाऊन मालेवाड्याला जात असताना बेडगाव घाटावर मागून येणाऱ्या ट्रक क्र. सीजी 04 एनटी 1113 चे ब्रेक फेल झाल्याने मोटारसायकला मागून धडक दिली. यात धदक नागसु दुर्ग कुंजाम व रामदास दर्याव कुंजाम हे दोघेही जागीच ठार झाले तर सुदैवाने मोटारसायकल चालक रमेश नागसु कुंजाम याना किरकोळ मार लागला. त्यांना कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ट्रकने पुणेवरून देवरी कडे जात असलेल्या ट्रक क्र. एमएच 14 एचयू 1862 ला जोरदार धदक दिल्याने दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !