नियमबाह्य पद्धतीने उमेदवारी अर्ज वैद्य ठरविणारे निवडणूक अधिकारी अगळे यांना निलंबित करुन फौजदारी खटला दाखल करा
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
चामोर्शी कृषि उत्पन्न् बाजार समिती निवडणूकीत पुराव्यासहीत कायदेशीरपणे आक्षेप घेतल्यानंतरही बेकायदेशीरपणे नियमबाहय पध्दतीने उमेदवारी अर्ज वैध ठरविणा-या निवडणूक निर्णय अधिकारी अगळे यांना तात्काळ निलंबीत करूण फौजदारी गुन्हा दाखल करा.
उत्पन्न् बाजार समिती निवडणूक 2022/23 – 2027/28 मध्ये निवडणूक परीपत्रक 03/03/2018 व निवडणूक घोषित कार्यक्रम 27/03/2023 च्या कार्यक्रमातील उमेदवारासाठी सर्वसाधारण सुचना तसेच महाराष्ट्र कृषि उत्पन्न् ( विकास व विनीयमन) अधिनियम 1963 चे भाग 5 च्या (कलम 21 च्या 2 नुसार) (कलम 25 च्या 2/ 2च्या अ/ब/क/ड नुसार (कलम 10/21/23) (कलम 25 च्या 3 नुसार) मतदार व उमेदवार एकापेक्षा जास्त् नामनिर्देशन पत्रावर सुचक किंवा अनुमोदक स्वाक्षरी करू शकत नाही, एकापेक्षा जास्त् नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी केल्यास ते उमेदवारी अर्ज (बाद) अवैध घोषित करण्यात यावे असा नियम आहे त्यानुसार अशापेक्षा एकापेक्षा जास्त् उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणा-या उमेदवार क्र. 1) अतुल गंगाधर गण्यापवार अर्ज क्र. 23/30 3) अमोल गंगाधर गण्यारपवार अर्ज क्र. 36/32 5) बअभिजीत अरूण बंडावार अर्ज क्र. 25/26 7) मल्लीक प्रेमानंद विश्वनाथ अर्ज क्र. 35 9) निखाडे सुधाकर पुंडलीक अर्ज क्र. 38/29 11) वंगावार शंकर राजय्या अर्ज क्र. 34 12) सातपुते गोसाई सिताराम अर्ज क्र. 28/52 15) परसोडे माधव जगन्नाथ 51 17) भंडारे गणपत तुकाराम अर्ज क्र. 47/33 19) पोरटे कौशल्याबाई श्यामराव अर्ज क्र. 48/31 22) जुवारे कुंदा नरेंद्र अर्ज क्र. 27 23) राय सतीश नरेन अर्ज क्र. 24/54 30) बामनकर रामचंद्र रावजी अर्ज क्र. 43 हे उमेदवार व यांचे सुचक अनुमोदक हे 3 ते 3 उमेदवारी अर्जावर सुचक अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेले आहे व स्व्त: उमेदवारही अनेक उमेदवारी अर्जावर सुचक अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेले आहे व उमेदवार अमोल गंगाधर गण्यापवार हे अडते असून त्याचे नांव अडते व्यापारी मतदारसंघात 41 क्रमांकावर नोंदणी असून त्यांना उमेदवार म्हणून उभे राहता येत नाही असे असतांनाही त्यांचा उमेदवारी अर्ज सेवा सहकार गटात सर्वसाधारण मतदारसंघात अर्ज वैध ठरविला आहे हे बेकायदेशीर आहे तसेच काही उमेदवारांचे सातबाराचे कोणतेही आक्षेप नसतांना सातबारा नाही या आधारावर ग्रामपंचायत गटातील उमेदवार अर्ज अवैध ठरविले व काही उमेदवारांचा सातबारा नसतांनाही त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला असे अनेक बेकायदेशीर व नियमबाहय निर्णय या निवडणूक निर्णय अधिका-याने घेतलेले आहे त्यामुळे हा निवडणूक अधिकारी एका विशीष्ट् गटासाठी काम करीत आहे व आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करीत आहे यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा व त्याचाच दबावात आम्हाला कोणताही सबळ कायदेशीर पुरावा न देता आमच्या गटाचे आक्षेप पुर्णत: फेटाळले व हा अधिकारी वरीष्ट् अधिका-यांच्या मेहरबाणीने व आर्थिक हितसंबध जोपासत आहेव हे काम तालुका खरेदी विक्री संघ चामोर्शी च्या निवडणूकीपासूनच असा बोगज काम या निवडणूक निर्णय अधिका-यामार्फत करण्यात येत आहे व यात सहकार क्षेत्रातील अनेक मोठे अधिकारी या अनेक वर्षापासून खरेदी विक्री, सेवा सहकारी संस्था व बाजार समिती चामोर्शी येथे स्वयंघोषित सहकार महर्षी ला वाचविण्यासाठी ही सर्व खटाटोप करीत आहे मात्र प्रत्येक तालुक्यातील तालुका निबंधक हा त्या तालुक्याचा निवडणूक निर्णय अधिकारी असतांना येथिल तालुका निबंधक घोडे साहेब यांना सिरोंचा येथ कार्यभार देवून सिरोंचा येथिल तालुका निबंधक अगळे यांना एका विषीष्ट् गटाला फायदा पोहचविण्यासाठी अशाप्रकारची खेळी काही सहकार क्षेत्रातील अधिकारी खेळत आहेत त्यामुळे आम्ही या निर्णयाने व्यथीत होवून वरीष्ट् अधिका-याकडे तशी न्यायासाठी अपिल केलेली आहे व आम्ही मुंबई उच्च् न्यायालयात दाद मागणार आहोत तरी या निवडणूक निर्णय अधिका-याला तात्काळ निलंबित करून नवीन निवडणूक अधिकारी नेमून हि निवडणूक प्रक्रीया निष्पक्ष, न्यायपुर्ण व पारदर्शक पध्दतीने होईल यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागणार आहोत त्यामुळे आम्हाला न्याय दयावा ही विनंती या पत्रकारपरीषदेतून आम्ही सर्व पत्रकार परीषद घेणारे व खाली स्वाक्षरी करणारे उमेदवार व सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते करीत आहोत.

