प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली तालुक्यातील रानभूमी-जांभळी जंगल
परिसरातील दारुअड्डे व 16 इम मोहफुलाचा सड़वा नष्ट केल्याची कृती गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तटीत्या केली. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गडचिरोली सीमेवर रानभुमी-जांभळी जंगल परिसरात हातभट्टी लावून दाऊ गाळली जात असल्याची गोपनीय माहिती मुक्तिपथला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस विभाग व गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूने सदर जंगल परिसटात शोधमोहीम राबवली असता, विविध ठिकाणी दारु गाळण्यासाठी टाकलेला लाखो रुपये किंमतीचा 16 इम मोहफुलाचा सडवा आढळून आला. पोलिस कर्मचारी व मुक्तिपथ चमूने संपूर्ण साहित्यांसह मोहफुलाचा सडवा नष्ट केला. सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी पार पाडली.