चाकूरला सहलीला निघालेल्या स्कूलबसला STची धडक ! २२ जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

0
चाकूरला सहलीला निघालेल्या स्कूलबसला STची धडक ! २२ जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

वैनगंगा वार्ता

Parbhani Accident News शैक्षणिक सहलीची बस आणि एसटी बसची धडक झाली. या भीषण अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. तर सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

गंगागेख राणी सावरगाव या मार्गावर हा अपघात झाला आहे.
गंगाखेडच्या संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल चाकूरकडे जाणार होती. ही स्कूलबसमध्ये काही पाक आणि शिक्षक प्रवास करत होते. तर अहमदपूर- बुलढाणा ही एसटी महामंडळाची बस राणी-सावरगाव जवळच्या खंडाळी गावाजवळ आल्यानंतर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही बसमधील तब्बल २२ जण जखमी झाले आहेत तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमीमध्ये १० ते १५ वर्षांचे तीन विद्यार्थी आहेत. २० ते २२ वर्ष वय असलेले चार ते पाच जण जखमींमध्ये आहेत.

सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

'भीक' शब्दावर चंद्रकांत पाटील ठाम म्हणाले आत्ताचा सीएसआर.
दरम्यान या जखमींना पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. तर सहा जणांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असून हा अपघात नेमका कशामुळे झाला ते अद्याप कळू शकलेले नाही.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !