अपंग मुलीला केले पायाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना

0
अपंग मुलीला केले पायाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना 
 
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

आरमोरी - 
अपंग मुलीला केले पायाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना
  गरीब मोलमजुरी करणारी व्यक्ती आपल्या मुलां मुलीना शस्त्रक्रिया करण्याकरीता लाखो रुपये जमविने शक्य नसते पण शस्त्रक्रिया होऊन आपला पाल्य बरा झाला पाहिजे हेच प्रत्येक पालकाची इच्छा असते यासाठी आपल्या मुलीचे मोफत शस्त्रक्रिया कशी होईल याच विवेंचनेत  असतो पण सरकारी काम आणी लांबचलांब थाब अशी परिस्थिती बहुतेक गरीब लोकावर येत असते
असाच प्रसंग आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील भैयाजी कन्नाके यांच्या दोन्ही पायाला अपंग असलेल्या लहान मुलीला आला यात लहानपणीच पासून श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे सभासद भैयाजी कन्नाके जोगीसाखरा  यांची मजवी मुलगी ऋतुजा दोन्ही पायाला अपंगत्व  आल्याने शस्त्रक्रियेसाठी लहान मुलीच्या शस्त्रक्रिया करीता महिला व बाल रुग्णालय डिईआयसी   वतीने  ० ते १८ वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांना जन्मतः असणारे आजार शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार बालपणातील आजार अपंगत्व.इतर आरोग्य तपासण्या व उपचारासाठी  गेल्या दोन वर्षांपूर्वी शिबिर घेण्यात आले होते परंतु कोरेनाच्या काळानी स्थगीत करण्यात आले आता दोन महिन्यांपूर्वी अजुन शिबिर घेण्यात आले यात बरेच मुला मुलींना शस्त्रक्रियेसाठी निवड करुन  अपंग मुलांना ताडकळड ठेवल्याने मुलीचे वडील यांनी श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या कडे वारंवार शिबिर घेऊन आम्हाला नाहक त्रास होतो आहे वारंवार जाणे  येणे हा खर्च विनाकारण जात असल्यामुळे माझ्या मुलीच्या शस्त्रक्रिया साठी पाठपुरावा करुन मदत करा अशी वारंवार मागणी केली असता यांची दखल घेऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम गडचिरोली नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी गडचिरोली येथील बाल रुग्णालय डिईआयसी रुग्णालयाचे व्यवस्थापक  डॉ प्रशांत खोब्रागडे यांची भेट देऊन  बालकांच्या शस्त्रक्रियेसंदर्भात विचारणा केली असता आरोग्य विभागात एकच खळबळ माजलीअखेर त्या मुलीला दोन्ही पायाच्या शस्त्रक्रियेसाठी चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजला रवाना केल्याने श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या प्रयत्नाने  त्या मुलीचा सोमवारी शस्त्रक्रिया होणार असल्याने मुलीच्या वडिलांनी डिइआयसी व्यवस्थापक डॉ प्रशांत खोब्रागडे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांचे आभार मानले.
यावेळी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे. उपाध्यक्ष शेषराव कुमरे सुनिल कुमरे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !