गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफीयांसाठी सोन्याचं अंड देणारा दिवस म्हणजे शनिवार रविवार

0
गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफीयांसाठी सोन्याचं अंड देणारा दिवस म्हणजे शनिवार रविवार..

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

वैनगंगा वार्ता/ दि. ५-१२-२०२२

 ::- मौजा जांभुळघाट येथे दिवस व रात्री ला अवैध मुरमाचे उत्खनन जेसीबी द्वारे मोठ्या प्रमानात सुरू आहे. याकडे महसुल व वन विभाग दुर्लक्ष करीत आहे. या विभागाच्या आर्शिवादानेच रेती व मुरमाचे अवैध उत्खनन होत असल्याचे दिसुन येत आहे. चिमुर कांपा राज्य मार्ग नेरी टि- पाईंट च्या बाजुलाच उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असताना याकडे महसूल विभागाचे व वनविभागाचे लक्ष का जात नाही. चिमुर च्या माफीयांची नजर जांभुळघाट, मालेवाडा या गावाकडे असून या माफीया लोकांचे दिखाव्यासाठी जांभुळघाट येथे विटा भट्टी धंदे आहेत पण मुख्य वैव्यसाय खौण खनिज उत्खनना चे सुरू आहे. आता तर माफीयांचे धंदयात स्पर्धा सुरू झाली आहे. तो करीत आहे तर आता मी पण करणार..? त्यांच्या वर कार्यवाही करेल तर माझ्या वर कार्यवाही होणार...? बगतो माझ्या वर कार्यवाही कोण करतो अश्या प्रकारची स्पर्धा चिमुर तालुक्यात गौण खनिज उत्खनन माफीयात सुरू आहे.

शनिवार रविवार सरकारी सुट्टी चा दिवस म्हणजे उत्खनन माफीया साठी एक प्रकारे सोण्याचा अंडा देणारा दिवसच असतो. यामुळे उत्खनन माफीयाची हिम्मत वाढतच चाललेली आहे. या कडे चिमुर महसुल प्रशासन कडून पाहीजे त्या प्रमाणात कार्यवाही होताना दितस नाही पण चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी लक्ष देणार का..? या कडे चिमुर च्या जनते च लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !