राजे धर्मराव हायस्कूल येथे आरोग्य तपासणी शिबीर
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
अडपल्ली (माल) :- राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) त.मुलचेरा व राष्टीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मुलचेरा यांचे संयुक्त विद्यामाने राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली (माल) येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले .
या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ.धम्मदीप धाकडे वैद्यकीय अधिकारी ,डॉ.दामिनी गायकवाड वैद्यकीय अधिकारी, कु.शुभांगी मेश्राम परिचारिका या वैद्यकीय चमूने विद्यार्थ्याची उंची ,वजन ,इतर आजार नेत्र तपासणी केली व त्याच्या आजारावर त्यांना लगेच औषधोपचार देण्यात आला तसेच सर्व विद्यार्थ्याना डॉ.धम्मदीप धाकडे वैद्यकीयअधिकारी व डॉ.दामिनी गायकवाड वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आपले स्वास्थ सुदृढ कसे राखावे ,स्वच्छता कशी पाळावी याबाबत मार्गदर्शन केले .
या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ११६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली . शाळेचे मुख्याध्यापक एन .एस.बोरकुटे सहाय्यक शिक्षक एम,बी.भोयर, आर.पी.लाकडे .जे.ए.शेख श्री व्हाय.व्ही.मडावी ,एन.डब्लू.शहारे ,सौ.के.एस.गुंडावार , डी.एस.नाईकवार ,डी.व्ही.गेडाम ,ए.व्ही.बोकडे , प्रकाश मुडपल्लीवार ,एल.पी.झाडे यांनी सहकार्य केले.

