आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी २१ डिसेंबर च्या मोर्चात सहभागी व्हा

0
आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी २१ डिसेंबर च्या मोर्चात सहभागी व्हा

 मुलचेरा येथे नियोजन बैठकीचे आयोजन


क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी

   गोंडवाना चौक मुलचेरा येथे आदिवासी समाजाच्या  न्याय हक्कासाठी 21 डिसेंबर रोजी नागपूर  विधान .भवनावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्या संबंधी नियोजन सभा घेण्यात आली त्यात प्रत्येक गावात सभा घेऊन त्या गावातील नागरिकांना सहभागी करून घेण्या संबंधी नियोजन करण्यात आले त्यानुसार गाव भेटीचे व भेटीत सहभागी होणाऱ्या कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचे संयुक्तपणे नियोजन तयार करण्यात आले . आपल्या घटनात्मक न्याय्य  अधिकारांसाठी आरपारची लढाई असल्याने यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष विकास नैताम . उप .नगराध्यक्ष मधुकर वेलादी .ऑल इंडिया आदिवासीएम्पलॉइज फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी, फेडरेशनचे तालुका पदाधिकारी रमेश कुसनाके , देवाची जोगे ,बुधाजी पल्लो . संतराम मडावी, सुधाकर तिमा , काशिनाथ आर्के,तालुका ग्रामसभेचे अध्यक्ष तथा नगरसेवक दिलीप आत्राम नगरसेवक बंडू आलाम , सामाजिक कार्य कर्ते गणपत मडावी, .दिनेश पेंदाम , बाबुराव जी आलाम , मुलचेरा ग्रामसभा अध्यक्ष दिगंबर गावडे . सचिव किसन आलाम , विश्वनाथ परचाके पवन आत्राम, अरविंद मडावी, क्रिष्णा परचाके, गुरु मडावी , तसेच गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !