पि. एल.जी. ए दिवस साजरा करा भारतीय कॉमुनिष्ठ पार्टीचे आवाहन 🔥वैरागड येथील आरमोरी-कुरखेडा आणि देलनवाडी टि पॉइंटवर बॅनर. 🔥लाल बॅनर अस्पष्ट आणि पुसट अक्षरात असल्याने समजण्यास अडचण. तात्काळ आरमोरी पोलिसांनी हटविले बॅनर

0
पि. एल.जी. ए  दिवस साजरा करा भारतीय कॉमुनिष्ठ पार्टीचे आवाहन

🔥वैरागड येथील आरमोरी-कुरखेडा आणि देलनवाडी टि पॉइंटवर बॅनर.

🔥लाल बॅनर अस्पष्ट आणि पुसट अक्षरात असल्याने  समजण्यास अडचण.

तात्काळ आरमोरी पोलिसांनी हटविले बॅनर



गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैरागड  येथील  मुख्य चौकात देलनवाडी कडे जाणारा रस्ता येथील एका हाटेल समोर दि ४ डिसेंबर ला बॅनर लावून  भारतीय कॉमुनिष्ठ पार्टीचे (मोओवादी) यांनी जनतेला आवाहन केले आहे
बॅनर मध्ये लिहिल्या प्रमाणे जनमुक्ती छापमार सेना (पि. एल.जी. ए.) यांची ११ वा स्थापना दिवस आहे. यासाठी ०१ ते ०८ डिसेंबर २०२२ पर्यंत क्रांतिकारी जोश आणि उत्साह मध्ये गावभर साजरा करण्यात यावे. तसेच शोषित, पिडित, गोरगरिब आणि जातीमुक्त समानता आधारावर भारत जनमुक्तीसाठी छापमार सेना मध्ये सहभागी होण्याचे आवाहन हिंदी आणि पुसट अक्षरात लावण्यात आलेल्या लाल बॅनर मध्ये भारत कॉमुनीस्ट पार्टी (माओ वादी) यांनी केले आहे. 
आज सकाळी कसरत करणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना वैरागड येथील आरमोरी-कुरखेडा आणि देलानावडी रोडकडे जाणाऱ्या टी पॉइंटवर एका चहा-नाष्टा हॉटेल समोर लाल बॅनर लावलेले दिसले. याबद्दल आरमोरी पोलिस विभागाला माहिती मिळताच सकाळीच तात्काळ बॅनर हटविण्यात आले. बॅनरवर लिहिण्यात आलेले अक्षर अस्पष्ट आणि पुसट असल्याने बॅनर समजण्यास अडचण जात आहे. लावण्यात आलेल्या बॅनरमुळे परीसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !