अखेर ते धोकादायक खड्डे बूजले
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
कूरखेडा-
राज्य महामार्ग असलेल्या कूरखेडा-कोरची मार्गावर शहरातील उपजिल्हा रूग्नालय नविन कर्मचारी निवासस्थाना समोर असलेले धोकादायक मोठे खड्डे येथील सामाजिक कार्यकर्त्यानी पूढाकार घेत मूरूम टाकून तात्पूरत्या स्वरूपात बूजवल्याने वाहन चालकाना मोठा दिलासा मीळाला आहे
राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने हा मार्ग वाहन चालका करीता धोकादायक ठरत आहे हे खड्डे बूजविण्याकरीता व दूरूस्ती कार्यवाही करीता अनेकदा प्रशासनाकडे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपूरावा केला आहे मात्र संबंधित विभागाकडून याकडे दूर्लक्ष करण्यात येत असल्याने हे खड्डे धोकादायक ठरत होते अनेकदा येथे लहान मोठ्या अपघाताचा घटणा सूद्धा घडलेल्या आहेत सदर समस्या या परीसरातील नागरीकांनी या मार्गावर सकाळी फिरायल्या जाणाऱ्या मार्निंग ग्रूप चे सदस्य रविंद्र गोटेफोडे, ॲड उमेश वालदे, संजय देशमूख, सिराज पठान यांच्या कडे मांडली होती
सदर गंभीर समस्या लक्षात घेत मार्निंग ग्रूपच्या सदस्यांनी शासकीय बांधकामाकरीता मूरूम पूरवठ्याचा कंत्राट असलेले कंत्राटदार खूशाल बंसोड यांची भेट घेत त्याना ही समस्या सांगत येथे सामाजिक उत्तरदायित्वाचा भावनेने निशूल्क मूरूम पूरवठा करत हे धोकादायक खड्डे बूजविण्याची गळ घातली त्यानी सूद्धा हे मान्य करीत आज स्वताच्या वाहनाने येथे मूरूम आणत या मार्गावर असलेले धोकादायक खड्डे तात्पूरत्या स्वरूपात मूरूम टाकत बूजविले त्यामूळे वाहन चालकाना दिलासा मिळाला आहे

