महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथील धनुर्विद्या खेळाडू ऑल इंडिया स्पर्धेसाठी रवाना

0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या खेळाडू ऑल इंडिया स्पर्धेसाठी रवाना

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता


आष्टी(वैनगंगा वार्ता) दिनांक 23 ते 28 डिसेंबर दरम्यान गुरू काशी,विद्यापीठ भटिंडा. येथे होणाऱ्या ऑल इंडिया धनुर्विद्या स्पर्धेकरिता महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या खेळाडूची निखिल भोयर, आंशिका वाल्दे, श्रेयश अवघड, गायत्री गुरुकार, निवड झाली असून ते विद्यापीठ गडचिरोली यांच प्रतिनिधित्व होणाऱ्या स्पर्धेदरम्यान करणार आहे , वरील संघामध्ये रोशन सोळंके, वैष्णव बावणे, प्रतीक पोकळे, मंगेश कस्तुरे, साहिल बुरांडे, समीर शेख, दर्शन मेश्राम तसेच मुलींच्या संघामध्ये रितिका चतुर, श्रुती गुरुकार, शुभांगी माहुरकर ,कुमुद ठाकूर, गायत्री गुरुवार , मोदींनी श्रीरामवार ,प्रज्ञा चांदेकर, संतोषी लेंगुरे, शोभा कुलमेटी ,फेमा सोहनकर ,कृष्णा शेख सदर खेळाडूचा समावेश आहे सदर खेळाडूना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी खेळाडू स्पर्धकांना मार्गदर्शन करताना जीवनामध्ये यशस्वी व्हायची असेल तर अपयशीची पायरी चढूनच यश संपादन करता येते त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये यश संपादन करीत असताना आपले उद्दिष्ट आणि ध्येय एका विशिष्ट केंद्रबिंदूवर नियंत्रित करून कुठल्या क्षेत्रामध्ये यश संपादन करता येते अशा प्रकारचे प्रतिपादन केले आणि खेळाडूंना स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याचे आवाहन केले. आणि भविष्यात होणाऱ्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्राचार्य श्री शैलेंद्र खराती. महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी, श्री सुशील अवसरमोल सर, उपस्थितीत होते सोबतच कार्यक्रमात शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते मुलीच्या संघाचे संघ मार्गदर्शक कुमारी पूजा डोरलीकर व्यवस्थापक सोनल चापके तथा मुलांच्या संघ मार्गदर्शन कुमार अरविंद बनकर तसेच संघ व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक शाम कोरडे यांची नियुक्ती झाली आहे
कार्यक्रमाचे संचालन कलरकोट धनुर्विद्या विद्यार्थी श्री। नितेश डोके तर आभार प्राध्यापक डॉ. भारत पांडे तसेच कार्यक्रमाला कार्यक्रमाला यशस्वीपणे पार करण्यासाठी डॉ. रवी शास्त्रकार डॉ. राज मुसणे, डॉ. गणेश खुणे, प्रा. रवी गजभिये प्राध्यापिका ज्योती बोभाटे तसेच शिक्षेत्तरकर्मचारी श्री. राजकुमार लखमापुरे, श्री निलेश नाकाडे, श्री लोमेश घुटके, श्री. मुस्ताक, श्री. विनोद तोरे, श्री सचित बछड, श्री संतोष बारापात्रे, श्री अतुल लटारे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !