
वैनगंगा वार्ता : गडचिरोली जिल्ह्याच्या अंकिसा ते आसरअली या राष्ट्रीय महामार्गावर एका स्कूल बसचा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या बसचा चालक नशेत असल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघाताची माहीती कळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने आपल्या मुलांना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले असुन जख्मी विद्यार्थ्यांचा उपचार सुरू आहे.
