धान्य व्यापाऱ्यांनी यांनी केली शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण
पोलीसांनी धान्य व्यापारी यास केली अटक
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी येथील कर्मचाऱ्यांना शेतमाल तपासणी नाक्यावर कार्यरत असतांना रामचंद्र सहारे रा. इंजेवरी यांना जिवे मारण्याची धमकी दिली व शेतमाल तपासणी करीता आलेल्या कर्मचाऱ्यांना मोठया धान्य व्याप्यारी कडून मारहाण केल्याची घटना दिनांक 17/ 12/2022 ला घडली असून समबधित धान्य व्यापारावर गुन्हा नोंद केल्याची घटना शनिवार ला घडली.
सविस्तर वृत्ती असे की, कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी येथे रोजंदारी प्रमाणे काम करणारे सहारे वय 50 वर्ष रा. इंजेवारी हे नेहमी प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती चा शेतमाल तपासणी नाका रामाळा येथे नेहमी प्रमाणे कार्यरत असतांना शेतमाल तपासणी नाक्यावर एक धान्य भरलेली गाडी क्रमांक mh 33 G 2273 मेटयाडोर आली असता मेटयाडोर चालकाला नाव, गाव, .विचारून नाहरकत प्रमाणपत्र , शेष पावती आहे काय? असे विचारले असता सदर चालकाने नाव, गाव न सांगता माझ्याकडे कोणतीही शेष पावती नाही असे सांगून उडवा उडवीचे उत्तर देऊन तुला काय करायचे आहे ते तू करून घे, तुला मी बघून घेईन असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली व शेतमाल तपासणी नाक्यावरून धान्य भरलेली गाडी घेऊन निघून गेला
. सदरील बाब रोजनदारी कर्मचारी याने दुरध्वनी च्या साहाय्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक कुथे यांना माहिती दिली. मेटयाडोर चालक व्यक्ती कोण आहे. हे आम्हाला माहिती झाल्याने घटनेची शहानिशा करणे काम आमच्या कार्यलयातील सहाय्य्क सचिव तितीरमारे, निरीक्षक कुथे यांच्यासह चालक हा प्रमोद सोमणकर याचा मुलगा असल्याकारणाने ते तिघेही दिनांक 17/12/2022 ळा अंदाजे दुपारी 12:30 च्या दरम्यान आंबेडकर शाळाजवळ त्यांचे धान्य खरेदीचे दुकान असल्याकारणाने त्या ठिकाणी गेलो व सदरील नाक्याच्या घटनेबाबत विचारणा केली असता गैर अर्जदार प्रमोद सोमनकर, त्याचा मोठा मुलगा अविनाश प्रमोद सोमनकर वय 20 वर्ष व त्याचा लहान मुलगा ऋतिक प्रमोद सोमनकर वय 18 वर्ष हे तिघेही त्या ठिकाणी हजर होते. व उडवा उडवीचे उत्तर देत आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही आम्हाचे काय करणार असे म्हणून शिवीगाळ करून सहारे यांच्या अंगावर मारण्याकरिता आले व तिन्ही गैरअर्जदार यांनी मारहाण करून ढकलढोप केले सदरील भांडण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ठावकर, व रोजनदारी कर्मचारी सरसले, या दोघांनी भांडण सोडविले या तिन्ही आरोपीनी माझ्यावर हमला करून, शिवीगाळ करून, मला मारण्याची धमकी देऊन मला माझे शासकीय काम करण्यास अरथळा निर्माण केला बाबतची तोंडी रिपोर्ट कनिष्ठ लिपिक कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी यांनी आरमोरी पोलीस ठाण्याला दिली.
सदरील तोंडी रिपोर्ट च्या आधारावर गैर अर्जदारावर भादवी.353, 323,504,506, अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आरमोरी ठाण्याचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौजदार चिकनकर व पोलीस अंमलदार उमेश ताटपल्लन करीत आहेत.
