फुले महाविद्यालयात अल्पसंख्यांक दिन साजरा
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी -वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकअधिकार दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते.प्रमुख अतिथी सामाजीक कार्यकर्ते सलीम भाई शेख होते .
यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजकुमार मुसणे,प्रा. डॉ.रवी शास्त्रकार, प्रा. रवी गजभिये, प्रा. शाम कोरडे ,डॉ. भारत पांडे, मुस्ताक शेख ,निलेश नाकाडे ,जोहर शेख , सुजित बाच्छाळ आदी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांनी सामाजिक सलोखा ठेवत अल्पसंख्यांक बांधवांच्या हक्क आणि अधिकाराकरिता जाणीव जागृतीची गरज असल्याची भावना व्यक्त केली. प्रा.राजकुमार मुसणे, प्रा. रवी गजभिये यानी हक्क व अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन लौकिक गेडाम यांनी प्रास्ताविक निलम वेलादी हिने तर उपस्थितांचे आभार मुस्ताक शेख यांनी मानले.

