महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी धनुर्विद्याचे विद्यार्थी राज्यस्तरासाठी पात्र

0
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी धनुर्विद्याचे विद्यार्थी राज्यस्तरासाठी पात्र


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच धनुर्विद्या खेळ प्रकारातील विभागीय स्पर्धा दिनांक 15/12/2022ते 17/12/20022 पर्यंत पायलट प्रोजेक्ट धनुर्विद्या खेळ क्रीडांगण गडचिरोली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. नागपूर विभाग अंतर्गत होत असलेल्या या स्पर्धेमध्ये नागपूर मनपा,नागपूर ग्रामीण, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर ग्रामीण, चंद्रपूर मनपा ,वर्धा, व गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. धनुर्विद्या खेळ स्पर्धेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी करून एकुण नऊ विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये यश संपादन केले.जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या खेळामध्ये व गडचिरोली जिल्ह्याचे नाव रोशन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वन वैभव शिक्षण संस्था आहेरी चे उपाध्यक्ष  बबलूभैया हकीम तसेच त्यांच्या सहचारीणी नागपूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला चे अध्यक्ष शाहीनभाभी हकीम या उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा छोटे गाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजित करण्यात आलेल्या धनुर्विद्या खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी देशपातळीचे नेतृत्व करावे व लौकिक वाढवून आपले भविष्य उज्ज्वल करावे. असा मोलाचा सल्ला वनवैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम यांनी दिला व पुढील वाटचाली करिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाहीनभाभी यांनीसुद्धा विद्यार्यांना शुभेच्छा दिल्या. या खेळाचे मार्गदर्शक प्राध्यापक श्याम कोरडे यांचे सुद्धा अभिनंदन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा हायस्कूल आष्टी चे प्राचार्य शैलेंद्र खराती यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य संजय फुलझेले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यामध्ये 14 वर्षे वयोगटात स्वरूप लखमापूरे वर्ग आठवा ,नेहा अवत्कार वर्ग 8 , सतरा वर्षे वयोगटांमध्ये मनस्वी बामनकर वर्ग10 वा
प्रथा हुलके वर्ग 10 वा कल्याणी वाकुडकर वर्ग 10वा
अस्मिता हुलके वर्ग 9 वा एकोणवीस वर्षे वया गटांमध्ये हिमांशी पुरमवार वर्ग 9वा 
जय वाकुडकर वर्ग 12 वा इत्यादी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यामधील 14 वर्षे वयोगटातील स्पर्धा उस्मानाबाद येथे होणार आहेत तर 17 वर्षे वयोगटातील स्पर्धा कोल्हापूर येथे होणार आहेत तसेच 19 वर्षे वयोगटातील स्पर्धा भंडारा येथे आयोजित करण्यात येणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना डॉ.प्रा. मुसने, प्रा.डॉ भारतपांडे,मुक्तदीरभैया,प्राध्यापक मंडळी मधून दिनकर हिरादेवे, रवींद्र इंगोले, बंडू सिंग राठोड, दिनकर टिकले,संतोष राठोड,शिक्षकांमधून संगीता कोडमलवार, अंक्लेश रोहनकर, अनिल पिसे, विनोद भूरसे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून वरिष्ठ लिपिक राजूभाऊ पोटवार, वरिष्ठ लिपिक राजूभाऊ लखमापूरे, कनिष्ठ लिपिक राजूभाऊ बरलावार, इत्यादी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी प्राध्यापक श्याम कोरडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले .तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील अवसरमोल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ प्रा शास्त्राकार यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !