माजी जि. प. सदस्य अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात सूरजागडसह विविध मुदद्यांवर लक्षवेधी आंदोलन धानाला बोनस न देण्याचा सरकारच्या निर्णयासबंधी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर फोडले खापट

0
 माजी जि. प.
सदस्य अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात सूरजागडसह विविध मुदद्यांवर लक्षवेधी आंदोलन धानाला बोनस न देण्याचा सरकारच्या निर्णयासबंधी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर फोडले खापट

लक्षवेध जनआंदोलन (मोर्चा)
भव्य चक्काजाम आंदोलन

सुरजागड लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा या प्रमुख
मागणीसह अनेक प्रलंबित प्रश्नावर माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांचा लक्षवेधी आंदोलन केले


प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी (वैनगंगा वार्ता) गडचिरोली :- सुरजागड लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा या प्रमुख
मागणीसह अनेक प्रलंबित प्रश्नावर माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार यांनी दिनांक 5
डिसेंबर गुरुवारी लक्षवेधी आंदोलन केले.

आष्टी येथील आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे अतुल गण्यारपवार यांनी लक्ष वेधले. सुरजागड पहाडीवरील लोहखनिजाच्या धुळीमुळे आलापल्ली ते आष्टी मार्गावरील रस्त्यालगतच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची भरपाई त्वरित देण्यात यावी, कोनसरी तेथील प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, धानाला बोनस देण्यात यावा, मेडींगट्टा प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा यासह जिल्हयातील विवीध प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना त्यांनी धानाला बोनस न देण्याच्या महविकास आघाडीच्या सरकारचा निर्णया सबंधी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर खापर फोडले. वडेट्टीवारांची धानाच्या बोनसच्यासंबंधी कुणीतरी दिशाभूल केली त्यांचे ऐकुन वडेट्टटीवार यांनी धानाच्या बोनसचा निर्णय होवू दिला नाही. त्यामूळे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, व नागपुर जिल्हयातील काही तालुक्यांतील तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामूळे आतातरी आपली चूक सुधारून वडेट्टीवारांनी धानाला परत बोनस मिळवून देण्यासाठी येत्या नागपुर अधिवेशनात धानाच्या बोनसची मागणी करावी. व यासाठी
केलेल्या आंदोलनात भाग घ्यावा व परत बोनस
मिळवुन द्यावा असे आवाहन केले.
या आंदोलनात बोरी, लगाम, आष्टी कोनसरी येनापुर कढोली ईल्लुर परिसरातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. यावेळी चामोर्शी चे नायब तहसीलदार काळे साहेब सदर मागण्याचे निवेदन देण्यात आले व आंदोलनाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !