प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
आष्टी (वैनगंगा वार्ता) महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथील खेलो इंडिया अंतर्गत धनुर्विद्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल च्या तेरा विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्तरावर झाली. हे विद्यार्थी विभागीय स्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील यांच्या पुढील यशस्वीते करिता महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र खराती महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक श्याम कोरडे, पर्यवेक्षक बैस,शारीरिक शिक्षक सुशील अवसरमोल,पर्यवेक्षक बैस,वेंकटरमण पोलोजी,पुंडलिक कविराजवार, अंक्लेश् रोहनकार,अनिल पिस,संगीता कोडमलवार, पायल येंबडवार,राजेश अंबिलपु,विनोद भूरसे मान्तेश रत्नावार,वरिष्ठ लिपिक राजू पोटवार, कनिष्ठ लिपिक राजू बरलावार , शिपाई लक्ष्मण दुरशेट्टी, नाना नेवारे ,बंडू दडजाम, आदी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

