राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब चोरणारी टोळी जेरबंद

0
राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब चोरणारी टोळी जेरबंद
१६ विद्युत खांब लंपा

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 


गडचिरोली, १० डिसेंबर - गडचिरोली- चामोशी राष्ट्रीय महामार्गावर विद्युत खांब लावण्याचे कंत्राट मिळताच संबंधित कंत्राटदाराने सदर मार्गावर 150 विद्युत खांब रस्त्याकिनारी टाकले होते. मात्र अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने विजेची खांबे कापून तब्बल 16 खांब चोरीला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यासंदर्भाची तक्रार प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या प्रकरणी चंद्रपूर व खांब चोरट्याच्या टोळीला जेरबंद करण्यात यश प्राप्त केले आहे.

गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर विद्युत खांब लावण्यात संबंधित कंत्राटदारास कंत्राट देण्यात आले होते. याअंतर्गत संबंधित कंत्राटदाराने खांबे गोविंदपूर नाल्यापासून टोल नाक्यापर्यंत विद्युत खांब गाडले होते.. मात्र अज्ञात चोरट्यांनी या मार्गावरील तब्बल 16 खांबे रात्रीच्या सुमारास गॅस कटरने कापून लंपास केले होते. संबंधित कंत्राटदाराने यासंदर्भात तक्रार दाखल करताच गडचिरोली पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता युद्धपातळीवर शोध मोहीम राबविली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा मार्गदर्शनात ठाणेदार अरविंदकुमार कतलाम, सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतनसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, परशुराम हलामी, सचिन आडे, सुजाता ठोंबरे यांच्या पथकाने चार आरोपींना अटक करीत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर लावलेले 16 विजेचे खांब गॅस कटरच्या माध्यमाने चोरी केल्या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी चंदपूर जिल्ह्यातील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात भारती देवी निसाद (22), सूरज रामचंद्र निसाद (20), गोविंद रामखिलातन निसाद (25) तिघेही रा. लखमापूर तर गुड्डू ऊर्फ अमन खान अहमदन खान (21) रा. रामनगर अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील भारत, सूरज आणि गोविंद या तीन आरोपींना पोलिसांनी 6 डिसेंबरला अटक करीत 7 डिसेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर यातील चौथ आरोपी गुड्डू ऊर्फ अमन खान याला शुक्रवारी अटक करण्यात आली. या टोळीतील चार आरोपींकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 16 वीज खांब, 3 लाख 50 हजार रूपये किंमतीचे महिंद्रा पीकअप वाहन, 30 हजार रूपये किमतीच्या दुचाकीसह गॅस कटर, सिलेंडर तथा अन्य साहित्य असा एकूण 5 लाख 66 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !