शिक्षकाचा अपघातात मृत्यू
भामरागड तालुक्यातील घटना
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
भामरागड तालुक्यातील जवळच असलेल्या गावात सकाळी आपल्या कर्तव्यावर जात असताना अपघात होऊन एका शिक्षकाला आपला प्राण गमवावा लागला .
मृतक शिक्षकाचे नाव मारोती निमसरकार असे असून ते आष्टी येथील निवासी आहेत परंतु ते भामरागड येथे वास्तव्य करुन जवळच असलेल्या ईरपनार येथे कर्तव्यावर सकाळी जात असताना त्यांच्या दुचाकी चा अपघात होऊन ते घटनास्थळी पडून राहीले मात्र त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही
त्यांच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली ते घटनास्थळी धाव घेऊन सर्व पोलीस प्रक्रिया करुन त्यांचा मृतदेह आष्टी येथील निवासस्थानी आनला उघा त्यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदी वरील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
त्यांच्या मागे पत्नी मुलगा व मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.

