आष्टी येथील जनजागरण मेळाव्यात विविध स्पर्धा संपन्न
आष्टी पोलीस चे आयोजन
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन च्या वतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते
पोलीस अधिक्षक गडचिरोली निलोत्पल अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली कुमार चिंता यांचे प्रेरणेने व उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनात व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आष्टी अंतर्गत आज दिनांक १९/ ११ /२०२२ रोजी सकाळी- १०:०० वा. पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा-आष्टी येथे महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी येथील भव्य पटांगणात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये भव्य बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा, आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा, राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून सदर स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.
सदर बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पोलिस स्टेशन आष्टी हद्दीतील एकूण-१८ संघांनी सहभाग नोंदविला. व भव्य आदिवासी पारंपारिक रेला समुह नृत्य स्पर्धेमध्ये- १० संघानी सहभाग नोंदविला. तसेच राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेमध्ये-०६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये आदिवासी युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन उत्कृष्टरित्या आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून
भव्य बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आष्टी नाका क्लब रा. आष्टी यांनी प्रथम क्रमांक
एम.जे.एफ. क्लब रा. आष्टी द्वितीय क्रमांक विशाल गृप रा. चौडमपल्ली तृतीय क्रमांक
आदिवासी पारंपारिक रेला
समुह नृत्य स्पर्धेमध्ये रेला डान्स गृप रा.अनखोडा प्रथम क्रमांक
जय माता गृप रा. ईल्लुर द्वितीय क्रमांक म.ज्यो.फुले हायस्कूल
रा.आष्टी तृतीय क्रमांक
राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धेमध्ये कु.आशिष गोमा गोवर्धन रा. मुधोली चेक नं. २
प्रथम क्रमांक सौ.विमल हिवराज वालदे रा. ईल्लुर द्वितीय क्रमांक
कु.काजल हरीदास अवथरे रा. आष्टी तृतीय क्रमांक
तिन्ही स्पर्धेमध्ये प्रत्येकी तिन्ही संघ यांनी आपल्या खेळाचे सादरीकरण करून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तिन्ही स्पर्धेच्या विजेता संघास पोलीस स्टेशन आष्टी वतीने अनुक्रमे ३०००/- रु २०००/-रु, १०००/- असे एकुण-१८,०००/- रु रोख पारितोषिक तसेच शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तिन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावीणा-या संघास उपविभागीय स्तरावर आपणास खेळण्यास संधी मिळेल असे पोलीस निरीक्षक कुंदन तू. गावडे यांनी सांगीतले तसेच पुढील स्पर्धेकरिता त्यांना प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धा कार्यक्रमास मौजा- आष्टी ग्रा.पं. सरपंच सौ. बेबीताई बुरांडे , महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य शैलेंद्र खराती तसेच शाळेतील शिक्षक रुंद तसेच विद्यार्थी/ विद्यार्थिनी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पोस्टे आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन तू. गावडे यांनी कार्यक्रमास उपस्थित स्पर्धक व नागरिक यांना गडचिरोली पोलीस दला अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच विविध प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सदर योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले
सदर स्पर्धेकरिता पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील २०० ते ३०० नागरिक /विद्यार्थी उपस्थित होते. सदर भव्य जनजागरण मेळावा व स्पर्धा कार्यक्रम यशस्वीरिते पार पाडण्याकरिता पोलीस स्टेशन आष्टीचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.


