सगनापुर - येणापूर पुलाची दुरावस्था आवागमन करताना शाळेकरी विद्यार्थ्यांची नागरिकांची दमछाक

0
सगनापुर - येणापूर पुलाची दुरावस्था 

आवागमन करताना शाळेकरी विद्यार्थ्यांची नागरिकांची  दमछाक


उपसंपादक // तेजल झाडे 9325801303 

चामोर्शी तालुक्यातील सगनापुर ते येनापुर या पूलाची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावर गेले असता पूलावर खड्डे की खड्ड्यात पुल असा नागरिकांना प्रश्न पडत आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याने पुलाची  दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे
  सगनापुर येथील नागरिकांना येनापुर चामोर्शी, आष्टी, गडचिरोली मार्गावर इतर ठिकाणी जाण्यासाठी अडचण होत आहे. अनेक दिवसापासून नागरिकांची कामे खोळंबून पडलेली आहेत शेतीच्या हंगामासाठी शेताकडे जाणेसुद्धा कठीण झाले पुलावरिल खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे यामुळे  शाळकरी विद्यार्थी,शेतकरी व  नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या सा.क्र.१०/६०० या ठिकाणी  पुलाची उंची व पक्क्या पूलाचे निर्मिती करणे अत्यावश्यक आहे 
 शासकीय बांधकाम विभागाच्या हि बाब जर निदर्शनास येत नसेल तर कार्यालयासमोर  आंदोलन करण्यात येईल असा इशारा अड्याळ ग्रामपंचायतीचे सरपंच कु.स्वाती हरिदास टेकाम व माजी तंटामुक्ती अध्यक्ष कोमल आक्केवार यांनी केली आहे. प्रशासन याकडे का लक्ष देत नाही. असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. सदर पुलाची दुरस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा गावकऱ्यांतर्फे सदर विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !