आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 2022- 23 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी, येथे दि. 20 -21 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाल्या सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आष्टी तसेच सह उद्घाटक प्राचार्य डॉ. संजय फुलझेले महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शैलेंद्र खराती महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल आष्टी व प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्राचार्य आशिष पैनकर गुरुकुल महाविद्यालय नांदा फाटा व तसेच पोलीस विभाग आष्टी येथील जिल्हा विशेष शाखा चे प्रमुख रोशन जनबंधू तसेच लॉएड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कोनसारी येथील कंपनीचे खेळाडू पुत्कर सिंकु व बुधन सिंघ सिंकू कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक कुंदन गावडे साहेब यांनी खेळाडूंना "प्रामाणिक पणे प्रयत्न केले तर यश नक्की प्राप्त होईल" असे मार्गदर्शन करत खेळाडूंना संबोधित केले. तसेच कार्यक्रमाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धनुर्विद्या खेळाडू असंख्य संख्येने सहभागी होते. सदर कार्यक्रमाचे संचालन अरविंद वनकर तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. श्याम कोरडे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी यांनी केले. व कार्यक्रमाचं शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन श्रृती गुरुकार हिने केले. तसेच शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , धनुर्विद्या खेळातील कलरकोट खेळाडू नितेश डोके, पूजा डोर्लीकर व इतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

